लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबला लागलेल्या आगप्रकरणी पब मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अग्नितांडवात 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे अग्नितांडव एवढं भीषण होतं की, मोजोसच्या खाली असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत होरपळून व गुदमरुन 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 हून अधिक जण जखमी आहेत, अशी माहिती केईएम प्रशासनानं दिली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी 4 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं असून, सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू आहे. रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मोजो पबमध्ये ही आग लागली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews